Navi Mumbai पोटच्या पोरांची विक्री, पोलिसांकडून दाम्पत्याला अटक

Navi Mumbai पोटच्या पोरांची विक्री, पोलिसांकडून दाम्पत्याला अटक

| Updated on: Jan 22, 2022 | 6:47 PM

आईची कसून चौकशी केली असता, पहिली मुलगी 90 हजार, दुसरी 2 लाख रुपयांना विकल्याचे तिने सांगितले. तर तिसरा मुलगा मात्र कुठे विकला याबाबत अजून काही समजले नाही.

नवी मुंबई : पैशासाठी जन्मदात्यांकडून पोटच्या पोरांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील नेरुळमध्ये उघडकीस आला आहे. हा गंभीर प्रकार महिला बाल विकास विभाग ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या घटनेची माहिती मिळताच महिला बाल विकास विभाग आणि नवी मुंबई पोलिसांनी आरोपी आईला अटक केली. तर मुख्य आरोपी फरार झाला होता. मात्र पोलीस पथकाने त्याला सुद्धा ताब्यात घेतले आहे. आईची कसून चौकशी केली असता, पहिली मुलगी 90 हजार, दुसरी 2 लाख रुपयांना विकल्याचे तिने सांगितले. तर तिसरा मुलगा मात्र कुठे विकला याबाबत अजून काही समजले नाही. तर दोन मुलांचा शोध लागला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू असून त्याला शोधण्यासाठी पथक रवाना झाले असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. (Shocking case of sale of children by parents in Nerul revealed)

देशवासियांनी भाजपाचं थोबाडं फोडलं – विनायक राऊत
लोकांच्या हिताची नक्कीच कामं करेन : Rohit Pawar