उरणमधील मृत यशश्री शिंदेवर वार की अत्याचार? शवविच्छेदन अहवालातून मोठा उलगडा

| Updated on: Jul 29, 2024 | 4:34 PM

यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगत तिचा मृतदेह सापडला होता. तिचे अवयव कापून ही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. यशश्रीवर अंत्यसंस्कारही करण्यात आले.

Follow us on

नवी मुंबईतल्या उरण येथे झालेल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणात कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा त्याचबरोबर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी कुटुंबीयांनी केलीय. संशयित आरोपी दाऊद शेख हा यशश्रीला खूप वर्षापासून त्रास देत होता आणि म्हणूनच 2019 साली त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल करून घेतला अशी माहिती यशश्रीच्या वडिलांनी दिलीय. आरोपी सोबत आमच्या मुलीचे प्रेम संबंध होते अशी खोटी माहिती समाज माध्यमात पाहायला मिळत असून ती पूर्णपणे खोटी आहे असेही कुटुंबातील सदस्यांनी सांगितली आहे. यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगत तिचा मृतदेह सापडला होता. तिचे अवयव कापून ही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. यशश्रीवर अंत्यसंस्कारही करण्यात आले. दरम्यान, यशश्री शिंदेच्या शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालासमोर मोठी माहिती समोर आली आहे.