Video : राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, पाहा व्हीडिओ

| Updated on: Aug 05, 2022 | 9:42 AM

मुंबई : हनुमान चालिसाप्रकरणी अटक आणि नंतर जामिनावर बाहेर असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी विशेष न्यायालयात करण्यात आली आहे. राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत, असा असल्याचा दावा या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी करताना सरकारी पक्षाने […]

मुंबई : हनुमान चालिसाप्रकरणी अटक आणि नंतर जामिनावर बाहेर असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी विशेष न्यायालयात करण्यात आली आहे. राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत, असा असल्याचा दावा या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी करताना सरकारी पक्षाने केला आहे. राणा दाम्पत्य जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाबाबत प्रसिद्धीमाध्यमांत भाष्य न करण्याची अट न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना घातली होती. त्या अटीच दिली. राणा दाम्पत्याने उल्लंघन केले आहे, असा दावा करून पोलिसांनी दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर राणा दाम्पत्यातर्फे गुरुवारी युक्तिवाद करण्यात येणार होता. परंतु ते दोघे किंवा त्यांच्यावतीने युक्तिवाद करणारे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते.

Video : आज गावागावात धुराळा!, 238 ग्रामपंचायतींचा निकाल
Video : अजित पवार आज बारामतीत, विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार