राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर केले, सुनावणीपूर्वी नवनीत राणांवर आणखी एक गुन्हा दाखल
Image Credit source: TV9

राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर केले, सुनावणीपूर्वी नवनीत राणांवर आणखी एक गुन्हा दाखल

| Updated on: Apr 24, 2022 | 1:16 PM

मुंबईमध्ये हनुमान चालीसेवरून (Hanuman Chalisa controversy) मोठा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या गोंधळानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवि राणा (Ravi Rana) यांना काल पोलिसांनी अटक केली होती.

मुंबईमध्ये हनुमान चालीसेवरून (Hanuman Chalisa controversy) मोठा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या गोंधळानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवि राणा (Ravi Rana) यांना काल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज बांद्रा कोर्टात हजर करण्यात आले आहे. मात्र सुनावणीपूर्वीच नवनीत राणा यांना आणखी एक धक्का बसला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कलम 353 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवणीत राणा यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे, या प्रकरणात नवनीत राणा यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published on: Apr 24, 2022 01:16 PM
किरीट सोमय्यांनी विनाकारण संघर्ष वाढवला : गृहमंत्री
माझा मनसुख हिरेन करण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा डाव- किरीट सोमय्या