VIDEO : Navneet Rana and Ravi Rana | राणा दाम्पत्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, अॅड. रिझवान मर्चट

| Updated on: Apr 24, 2022 | 2:20 PM

पोलिसांनी  रिमांड कॉपीत राणा दाम्पत्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही ही मागणी लावून धरत राणा यांच्यावरील आरोप किती गंभीर आहेत. याची माहिती कोर्टाला दिली. तर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी ही अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगत राणा दाम्पत्यांच्या पोलीस कोठडीला विरोध केला आहे. राणा दाम्पत्यांवर खार पोलीस ठाण्यात 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. वांद्रे कोर्टाचे न्यायाधीश ए. ए. घनीवाले यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी तात्काळ वांद्रे कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, कोर्टाने 29 एप्रिल रोजी त्यांच्या जामीन अर्जावर फैसला होणारा आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. पोलिसांनी  रिमांड कॉपीत राणा दाम्पत्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही ही मागणी लावून धरत राणा यांच्यावरील आरोप किती गंभीर आहेत. याची माहिती कोर्टाला दिली. तर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी ही अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगत राणा दाम्पत्यांच्या पोलीस कोठडीला विरोध केला आहे. राणा दाम्पत्यांवर खार पोलीस ठाण्यात 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO : Raosaheb Danve | सोमय्यांवरील हल्ला लोकशाहीला न शोभणारं कृत्य तर हनुमान चालिसाला एवढा विरोध का?
Video : कुणाला भेटायचंय त्यांना भेटा, धमक्या देऊ नका- संजय राऊत