Navneet Rana | खासदार नवनीत कौर राणा यांचे करवा चौथ
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सुद्धा दरवर्षी करवा चौथ व्रत करतात रविवारी त्यांनी दिवसभर उपवास करून रात्री चंद्र व नंतर आपल्या पतीचे अर्थात आमदार रवी राणांचे मुखदर्शन घेवून उपवास सोडला.
मुंबई : कॅलेडर नुसार दर वर्षी कार्तिक महिन्याच्या चौथ्या (चतुर्थीस) करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदीभाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच शिव शंकराला व सूर्याला जलअर्घ्य देवून सकाळ ते रात्री चन्द्रदर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना,हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात. विवाहित महिला मोठ्या उत्साहाने साज श्रुंगार करून पीठ गळण्याच्या गाळणीत आधी चंद्र व नंतर आपल्या पतीचे मुखदर्शन घेवून त्यांच्या हातून पाणी पिवून हे संस्कारी व्रत समाप्त करतात.अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सुद्धा दरवर्षी करवा चौथ व्रत करतात रविवारी त्यांनी दिवसभर उपवास करून रात्री चंद्र व नंतर आपल्या पतीचे अर्थात आमदार रवी राणांचे मुखदर्शन घेवून उपवास सोडला.