Bacchu Kadu : बच्चू कडू यांनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, ‘मला पाडण्याची त्यांची…’

| Updated on: Nov 28, 2024 | 2:43 PM

अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाला, या पराभवावर स्वतः बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये...

माझ्या पराभवाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. मला पाडण्याची राणांची लायकी नाही, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांनी केली. तर जनतेने बच्चू कडू यांना त्यांची लायकी दाखवली असल्याचे म्हणत नवनीत राणा यांनी पलटवार केलाय. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाला, या पराभवावर स्वतः बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये, पूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदललं आहे. जर महाराष्ट्राचे चित्र वेगळं असतं आणि मी पडलो असतो तर राणा दाम्पत्याला श्रेय दिलं असतं, असा टोला बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे. श्रेय घेण्यासाठी हपापलेले लोकं आहेत, तर आम्हाला पाडण्याची राणा दाम्पत्याची औकात नाही. असे म्हणत कोणताही मतदारसंघ निवडा तुम्ही बिगर पार्टीचे आणि मी बिगर पार्टीचा असं थेट आव्हान बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिलं आहे. या टीकेवर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, कोणी कोणाचं श्रेय घेत नाही. आम्हाला श्रेय घ्यायची गरज नाही. इलेक्शन झाल्यावर जास्त बोलणारा बच्चू कडू याने थोडं कमी बोलावं. पाच वर्षांनंतर त्यांचे आव्हान मी स्वीकारेन. थोड्याच दिवसात बच्चू कडू कोणत्या तरी पक्षात प्रवेश असणार असा खोचक पलटवार राणा यांनी केला.

Published on: Nov 28, 2024 02:43 PM
Sanjay Raut : ‘… यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये’, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Shahaji Bapu Patil : ‘… तर राजकीय संन्यास घेईल’, शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?