मेळघाटात होळी निमित्ताने MP Navneet Rana यांनी धरला आदिवासी नृत्यांवर ठेका

| Updated on: Mar 18, 2022 | 9:51 AM

राज्यात ठिकठिकाणी काल होळीचा उत्साह होता. पारंपरिक पद्धतीनं अनेक ठिकाणी होळी (Holi) साजरी करण्यात आली. तर आज धुलिवंदन साजरा करण्यात येतोय. खासदार नवनीत राणा (Navneet Rana)आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) या दाम्पत्यानेही काल होळीचा उत्साह साजरा केला.

अमरावती : राज्यात ठिकठिकाणी काल होळीचा उत्साह होता. पारंपरिक पद्धतीनं अनेक ठिकाणी होळी (Holi) साजरी करण्यात आली. तर आज धुलिवंदन साजरा करण्यात येतोय. खासदार नवनीत राणा (Navneet Rana)आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) या दाम्पत्यानेही काल होळीचा उत्साह साजरा केला. यावेळी राणा दाम्पत्याने मेळघाटात होळीचा उत्साह साजरा केला. विशेष म्हणजे आदिवासी बांधवांसोबत राणा दाम्पत्याने होळी सण साजरा केलाय. आता इतक्या उत्साहाच्या वातावरणात शांत बसणार त्या नवनीत राणा कसल्या. कोणताही उत्साहाचा क्षण असला की नवनीत राणा त्यामध्ये सहभागी होताच. यापूर्वी देखील त्यांनी अनेकदा नृत्यावर ठेका धरलाय. मेळघाटात होळीचा उत्साह असताना रवी राणा यांनी ढोलकी वाजवली तर नवनीत राणा यांनी आदिवासी नेतृत्यावर ठेका धरला. यावेळी राणा दाम्पत्याचा उत्साह पाहून उपस्थितांनीही त्यांचं कौतुक केलं.

मेळघाटात होळीचा उत्साह

मेळघाटात आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतात.  यावेळी ते आदिवासी नृत्यही करतात. मेळघाटासह राज्यातील विविध भागात होळीचा उत्साह असतो. मेळघाटात राणा दाम्पत्याने आदिवासी नृत्यावर धरलेला ठेका सध्या चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे आदिवासी बांधवांसोबत राणा दाम्पत्याने होळी सण साजरा केला.

Published on: Mar 18, 2022 09:50 AM
‘इस्लाम धर्म हाच हिंदुस्तानचा खरा शत्रू’, Sambhaji Bhide यांचं वादग्रस्त विधान
कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह, ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा अनोखा सोहळा !