मर्द असशील तर… राणांच्या तोडीबाज टीकेवरून बच्चू कडूंचं ओपन चॅलेंज

| Updated on: Apr 05, 2024 | 10:52 AM

अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. तर मेळाव्यातून राणांनी बच्चू कडू यांच्यावर जळजळीत टीका केली. बच्चू कडू यांनी राणांवर तोडीबाज अशी टीका केली. त्यानंतर आरोप सिद्ध करण्याचं बच्चू कडू यांचं राणांना आव्हान

अमरावती निवडणुकीमध्ये बच्चू कडू आणि नवनीत राणा हे आमने-सामने आलेत. अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. तर मेळाव्यातून राणांनी बच्चू कडू यांच्यावर जळजळीत टीका केली. बच्चू कडू यांनी राणांवर तोडीबाज अशी टीका केली. त्यानंतर आरोप सिद्ध करण्याचं आव्हान बच्चू कडू यांनी राणांना दिलंय. निमित्त नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं होतं. याप्रसंगी नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर प्रहार केला. दीड वर्षांपूर्वी रवी राणा आणि बच्चू कडू आमने-सामने आले होते. तीच टीका रवी राणांनी पुन्हा करत त्यांना तोडीबाज म्हटलं. अमरावतीत नवनीत राणांचा सामना हा प्रहारचे दिनेश बूब आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याशी आहे. म्हणजेच अमरावतीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 05, 2024 10:52 AM
भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं, मुख्यमंत्र्यांनी काय दिलं आश्वासन?
जागावाटपात भाजपचं वर्चस्व… शिंदेंच्या 5 खासदारांचा पत्ता कट? विरोधकांचा निशाणा काय?