Navneet Rana | बंगाल आणि महाराष्ट्र दोन्ही वेगळे विषय, ममतादीदींनी बंगालपर्यंतच सीमीत राहावं- राणा
हाराष्ट्रा हा काही पश्चिम बंगाल नाही. महाराष्ट्रात येण्यापूर्वी त्यांना मोठा विचार करावा लागेल. ममता बॅनर्जी यांनी बंगालपुरतं मर्यादित राहावं. महाराष्ट्राची जनता समजूतदार आहे, असा टोला नवनीत राणा यांनी लगावलाय. त्याचबरोबर विरोधकांना संसदेत आता कुठलेही मुद्दे राहिलेले नाहीत. ज्यांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या त्या थांबल्यामुळे विरोधक अशी भूमिका घेत असल्याची टीकाही राणा यांनी केलीय.
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत त्यांच्या गाठीभेटी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींना जोरदार टोला लगावलाय. महाराष्ट्र हा पश्चिम बंगाल नाही. महाराष्ट्रात येण्यापूर्वी मोठा विचार करावा लागेल, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलंय.
महाराष्ट्रा हा काही पश्चिम बंगाल नाही. महाराष्ट्रात येण्यापूर्वी त्यांना मोठा विचार करावा लागेल. ममता बॅनर्जी यांनी बंगालपुरतं मर्यादित राहावं. महाराष्ट्राची जनता समजूतदार आहे, असा टोला नवनीत राणा यांनी लगावलाय. त्याचबरोबर विरोधकांना संसदेत आता कुठलेही मुद्दे राहिलेले नाहीत. ज्यांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या त्या थांबल्यामुळे विरोधक अशी भूमिका घेत असल्याची टीकाही राणा यांनी केलीय.