Navneet Ravi Rana यांना अटी शर्थींसह जामीन मंजूर

| Updated on: May 04, 2022 | 6:05 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा तुरुंगातील मुक्काम सातत्यानं वाढला होता. त्यामुळे त्यांना जामीन मिळतो की नाही, याकडे सगळ्यांची नजर लागली होती.

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा तुरुंगातील मुक्काम सातत्यानं वाढला होता. त्यामुळे त्यांना जामीन मिळतो की नाही, याकडे सगळ्यांची नजर लागली होती. सोमवारी या जामीनावर युक्तिवाद झाला होता. त्यानंतर कोर्टानं बुधवारी म्हणजे आज प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. अखेर राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निर्णय आज सुनाण्यात आला. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट दुसऱ्या प्रकरणांमध्ये व्यस्त होती. तरीही थोडा फार वेळ देत कोर्टानं निकाल वाचनास बुधवारची वेळ दिली होती. आज या निकालाचं वाचन करण्यात आलं. त्यात राणा दाम्पत्याला जामीन देण्याचा निर्णय घेत असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं. मात्र त्यासोबत कोर्टानं तीन महत्त्वाच्या अटी राणा दाम्पत्याला जामीन देताना घातल्या आहेत.

Published on: May 04, 2022 06:05 PM
भीमा कोरेगाव प्रकरण: संभाजी भिडेंना आरोपातून वगळलं
‘…म्हणून स्वाभाविक आहे त्यांना जामीन मिळाला’ – देवेंद्र फडणवीस