Mahur Renuka Devi : माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात, रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

| Updated on: Oct 03, 2024 | 3:47 PM

Maharashtra Navratra Utsav 2024 : नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. माहूर गडावरही रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रिघ आहे.

Follow us on

राज्यभरात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज पहाटेपासूनच राज्यभरातील विविध मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली असून सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण दिसत आहे. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील श्री रेणुका मातेच्या माहूर गडावर देखील नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. आज नवरात्रोत्सवाची पहिली माळ आहे. श्री रेणुका मातेची शासकीय महापूजा, त्यानंतर साडेनऊ वाजता घटस्थापना, घटस्थापनेनंतर नवरात्र उत्सवाला मंदिरात सुरुवात झाली आहे. मंदिर संस्थानकडून नऊ दिवस गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माहूर गडावर रेणुका मातेचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दर्शन घेतले. संतोष बांगर यांनी सपत्नीक दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पुन्हा महाराष्ट्राचे व्हावेत. महाराष्ट्राच्या राजगादीवर एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत, अशा प्रार्थना रेणुका मातेच्या चरणी आमदार बांगर यांनी घातलं आहे.