Mohit Bharatiya | नवाब मलिक हे आपल्या पदाचा दुरुपयोग करतात, मोहित कंबोज यांचे आरोप
पत्राचा जो एनवलप आहे त्याचावर बिहार बेगूसराय असा उल्लेख आहे. त्यांनी डेट मिटवली परंतु बिहार त्याना लक्षात आलं नाही.नबाब मलिक हे आपल्या पदाचा दुरुपयोग करुन केंद्रीय अजेंशीला बदनाम करण्याचं प्रयत्न करत आहे, असा आरोप मोहित कंबोज यांनी केलाय.
मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चार पानांचं पत्र एनसीबीच्या अधिकाऱ्यानं पाठवल्यांचं म्हटलं होतं. नवाब मलिकांनी ते पत्र एनसीबीकडं चौकशीसाठी पाठवलं होतं. आता नवाब मलिक यांना मिळालेल्या चार पानी पत्राबद्दल भाजपच्या मोहित कंबोज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. यानिमित्तानं क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील रोज नवनवीन खुलासे होत असताना पाहायला मिळत आहेत. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी म्हटले की नबाब मलिक यांनी काल सकाळी चार पेजचं पत्र ट्विट केलं होतं..त्यांनी म्हटले की मुंबई एनसीबीचे एक अधिकारीने त्यांना हे पत्र पाठवलं आहे. त्या पत्राचा तपास करत असताना माहीत पडलं की नवाब मलिक यांनी स्वतः पत्र, स्वतःला पाठवले आणि सांगत आहेत की एनसीबीचे अधिकारीने पत्र पाठवलं. पत्राचा जो एनवलप आहे त्याचावर बिहार बेगूसराय असा उल्लेख आहे. त्यांनी डेट मिटवली परंतु बिहार त्याना लक्षात आलं नाही.नबाब मलिक हे आपल्या पदाचा दुरुपयोग करुन केंद्रीय अजेंशीला बदनाम करण्याचं प्रयत्न करत आहे, असा आरोप मोहित कंबोज यांनी केलाय.