Nawab Malik यांना अटक, भाजप नेते Mohit Kamboj यांनी तलवार दाखवली | Nawab Malik Arrested
एका भाजप नेत्यांच्या अडचणीतही मोठी वाढ झाली. भाजप नेते मोहीत कंबोज यांनी नवाब मलिकांच्या अटकनंतर तलवार दाखवली आणि हेच प्रकरण त्यांना महागात पडलंय.
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या तगडी फाईट सुरू आहे. मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्याने विरोधक आणि सत्ताधारी पु्न्हा आमनेसामने आले आहेत. महाविकास आघाडी नवाब मलिक यांचा राजीनामाही घेण्याची शक्यता आहे. मात्र आज एकट्या नवाब मलिक यांच्याच अडचणीत वाढ झाली नाही. तर एका भाजप नेत्यांच्या अडचणीतही मोठी वाढ झाली. भाजप नेते मोहीत कंबोज यांनी नवाब मलिकांच्या अटकनंतर तलवार दाखवली आणि हेच प्रकरण त्यांना महागात पडलंय. कारण या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी मोहीत कंबोज यांच्या घराचा दरवाजा ठोठावला आहे. मोहीत कंबोज हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून वादत सापडलं आहे. मोहीत कंबोज यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोपही महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहेत.