वेळ आली तर तुमची काळी संपत्ती बाहेर काढणार; मलिकांचा अमृता फडणवीसांवर निशाणा

| Updated on: Nov 10, 2021 | 11:46 AM

नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे.

मुंबई – नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. अमृता फडणवीस यांनी संपत्तीवरून नवाब मलिक यांच्यावर आरोप केले होते. याला उत्तर देताना मलिक यांनी म्हटले आहे की, कोणाकडे काळी संपत्ती आहे याची चौकशी होऊ द्या. मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. मात्र मग मी जे पुरावे सादर करेल त्याच्या आधारे देखील चौकशी झाली पाहिजे.

मानखुर्दमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; आंदोलनाला दरेकरांचा पाठिंबा
फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट – मलिक