Assembly Election Result 2024 : मलिक बाप-लेक दोघंही पिछाडीवर, अणूशक्तीनगर अन् मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?

| Updated on: Nov 23, 2024 | 10:59 AM

मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात नवाब मलिक प्रचंड धक्का बसला आहे. ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अबू आझमी यांना 3 हजार 884 तर नवाब मलिक यांना फक्त 461 मते मिळाल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. अणुशक्तिनगर विधानसभेतून फहाद अहमद सध्या आघाडीवर असून अजितदादा गटाच्या सना मलिक या पिछाडीवर आहेत.

मुंबईतील मानखुर्द हा शिवाजीनगर मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बाल या विरोधी पक्षांकडून कडवी टक्कर देत सलग तीनदा विजय मिळवला होता. गेल्या 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाचे अबू आझमी 69 हजार 036 मतांनी विजयी झाले होते. 2014 मध्ये देखील अबू आझमी यांनी 41 हजार 720 मतांनी मोठा विजय मिळवला होता. यंदा मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात महायुतीकडून नवाब मलिक हे रिंगणात आहेत. मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात नवाब मलिक प्रचंड धक्का बसला आहे. ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अबू आझमी यांना 3 हजार 884, अतिक खान (MIM) यांना 3 हजार 617 मते मिळाली आहेत. तर नवाब मलिक यांना फक्त 461 मते मिळाल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिकांची लेकही अणुशक्तिनगर मतदारसंघातून पिछाडीवर आहे. अणुशक्तिनगर विधानसभेतून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद निवडणूक लढत आहेत. फहाद अहमद सध्या आघाडीवर असून अजितदादा गटाच्या सना मलिक या पिछाडीवर आहेत.

Published on: Nov 23, 2024 10:59 AM