आगामी सुनावणीपर्यंत मलिक सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबियांबाबत काहीही पोस्ट करणार नाहीत- दिवाकर राय

| Updated on: Nov 25, 2021 | 3:31 PM

पुढील सुनावणीपर्यंत आठवडाभर फिर्यादी ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतेही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्यं केली जाणार नाहीत, मग ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रसिद्धी माध्यमातून असोत, असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य किंवा आरोप करण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर वानखेडे कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी नवाब मलिक यांनी वकिलांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टाला दिली.

पुढील सुनावणीपर्यंत आठवडाभर फिर्यादी ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतेही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्यं केली जाणार नाहीत, मग ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रसिद्धी माध्यमातून असोत, असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे.

Shashikant Shinde | माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार, शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
Nawab Malik | देशात कोणतेही महामंडळ सरकारमध्ये विलीनीकरणात नाही- मलिक