नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; देवेंद्र फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशीही नवाब मलिक विधानभवन परिसरात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. तर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही नवाब मलिक सभागृह सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी कार्यालयात, पण फडणवीस यांच्या लेटरबॉम्बचं काय?
नागपूर, ८ डिसेंबर २०२३ : आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशीही नवाब मलिक विधानभवन परिसरात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या दुसऱ्या दिवशी सभागृह सुरू होण्यापूर्वीच नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात थांबले होते. काल अधिवशेनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर पाहिला मिळाले होते. तर आज पुन्हा नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, काल नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडवणीस यांना डिवचलं होतं. यानंतर त्यांनी दानवे यांना प्रत्युत्तर देखील दिलं होतं. इतकंच नाहीतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात अजित पवार यांना एक पत्र देखील पाठवलं होतं. यामध्ये फडणवीस यांनी महायुतीमध्ये नवाब मलिक यांना स्पष्टपणे नो एन्ट्री असे म्हटले होते. तर आज मलिक कोणत्या बाकावर बसणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.