नवाब मलिक यांच्यासाठी अजित पवार यांचा गट आशावादी पण भाजपची गोची होण्याचं कारण काय?
VIDEO | जेलमधून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा हा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यापुढे प्रश्न... तर नवाब मलिक सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत... बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १५ ऑगस्ट २०२३ | नवाब मलिक यांच्यासाठी अजित पवार गट आशावादी दिसतोय. मलिक लवकरच आम्हाला पाठिंबा देतील, असा विश्वास अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला. मात्र तसे झाले तर भाजपची भूमिका काय असेल? दीड वर्षांनंतर नवाब मलिक जामिनावर बाहेर आले. वैद्यकीय कारणासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यासाठी जामीन दिलाय. मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा हा प्रश्न नवाब मलिक यांच्यापुढे आहे. अजित पवार यांचा गट की शरद पवार यांचा गट…जामिनावर मलिकांची सुटका झाली त्यावेळी सुप्रिया सुळे या मलिक यांच्या कुटुंबासोबत होत्या. तर दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे नवाब मलिक यांच्या घरी आले होते. मलिक आमचे बंधू आहेत त्यांच्या भेटीमागे राजकीय कारण नाही असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले. तर प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आम्ही गेलो या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे अजित पवार गटाकडून सांगण्यात आले. दरम्यान, नवाब मलिकांच्या भावाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले की, मलिक हे सध्या प्रकृतीकडे लक्ष देतील नंतर ते स्वतः ठरवतील कोणत्या गटात जायचे… बघा मलिकांच्या भेटीनंतर कोण काय म्हणाले…