न्यायालयाने याची गंभीर दखल घ्यावीः अमित देसाई

| Updated on: Feb 23, 2022 | 11:00 PM

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडीकडून कारवाई करण्यात आल्यावर मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडीकडून कारवाई करण्यात आल्यावर मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी न्यायालयासमोर त्यांनी मलिक यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांचे सामाजिक जीवन याबद्दलही त्यांनी बाजू मांडली. 2005 मध्ये तीनशे कोटीची मालत्ता होती असे वाटत नाही म्हणत त्यांनी मंत्री मलिक यांना अटक करणे म्हणजे हिंदी फिल्मची ही स्क्रिप्ट नाही असाही त्यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी न्यायालयाकडे नवाब मलिक हे मंत्री असून ते गेले कित्येक वर्षापासून ते सार्वजनिक मंत्री असल्याचेही सांगितले. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अटकेबद्दल न्यायालयाने गांभीर्याने दखल घ्यावी असेही त्यांनी सांगितले. नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून कारवाई झाल्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाबद्दलही चंद्रकांत पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Special Report | ठाकरे सरकारचे आणखी एक मंत्री अटकेत
Special Report | नवाब मलिक यांचा राजीनामा नाहीच, मविआची रोखठोक भूमिका