Nawab Malik | 20 हजारांचा आकडा पुढे गेला तर लॉकडाऊन लागण्याची शक्यता : नवाब मलिक
बुली बाई या प्लॅटफॉर्मवर महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावणे तसेच आक्षेपार्ह वक्तव्य केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारणातंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. याबाबत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे, शेवटपर्यंत याचा छडा लावलेयाशिवाय पोलीस थांबणार नाहीत.
बुली बाई या प्लॅटफॉर्मवर महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावणे तसेच आक्षेपार्ह वक्तव्य केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारणातंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. याबाबत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे, शेवटपर्यंत याचा छडा लावलेयाशिवाय पोलीस थांबणार नाहीत. मागील सहा महिन्यांपासून हे सुरु असून राज्य सरकार तसेच पोलीस याचा छडा लावणार आहेत, अशी माहिती दिली आहे. याआधी त्यांनी बुली बाई आणि सुली डील अशा प्लॅटफॉर्मवर अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांची बोली लावली जात असल्याचा आरोप केला होता.
“बुली बाई प्रकरणात तपास सुरू होता. हा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. या प्रकरणाचा शेवटपर्यंत याचा छडा लावल्याशिवाय पोलीस थांबणार नाहीत. अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांची बोली लावली जातेय. 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. दिल्ली पोलिसांनी याची दखल घेतली नाही. मात्र राज्य सरकार आणि पोलीस याचा छडा लावणार आहेत,” असे नवाब मलिक यांनी सांगितले.