Nawab Malik | नवाब मलिक यांचा नव्या वर्षाचा संकल्प काय?
नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खंडणी तसेच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र दिल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. तसेच क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाला गोवण्यात आले आहे. यामागे भाजपचा हात असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे.
मुंबई : नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खंडणी तसेच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र दिल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. तसेच क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाला गोवण्यात आले आहे. यामागे भाजपचा हात असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. यावेळी बोलताना “फर्जीवाड्याचा माझा लढा सुरु राहील. हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. 18 कोटींची डील 50 लाखांची वसुली याचा काय अहवाल आला आहे ? जनतेच्या पैशांवर अधिकारी लोक पैसे वाया घालवतात हे कधीपर्यंत चालणार आहे ? आम्ही कोर्टाची लढाई लढू. सत्य समोर येईल. भ्रष्ट अधिकाऱ्य़ांना शिक्षा होणारच आहे. शेवटपर्यंत माझा लढा सुरु राहील,” असे मलिक म्हणाले.
Published on: Jan 01, 2022 12:26 PM