नवाब मलिक यांची खरी जागा जेल – निलेश राणे
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे दाऊदचे फंट मॅन (Dawood’s Front Man) असा शकतात अशी खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय.
रत्नागिरीः अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे दाऊदचे फंट मॅन (Dawood’s Front Man) असा शकतात अशी खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय. याच मुद्यावर माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. दाऊदच्या माणसाकडून कवडीमोल भावात जमीन खेरदी केली. त्यातही ब्लॅक मनीचा वापर झालाय त्याचमुळे याचा ट्रेंड ईडी घेतंय. दाऊद हा देशाचा एक नंबरचा शत्रू आहे.