Nawab Malik | भाजप चोर रस्त्याने निवडणुका जिंकतं, पैसे टाकून विकत घेण्याचा नेहमीचा प्रयत्न-मलिक

| Updated on: Dec 14, 2021 | 6:55 PM

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे, हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला. त्याचधर्तीवर कायदा झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबई: अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने निकाल लागला आहे. मात्र या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे, हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला. त्याचधर्तीवर कायदा झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

केंद्राला शिफारस करू

राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या बाबतीतही संसदेत कायदा करण्याची गरज आहे. राज्यसरकारला अधिकार असेल तर आम्ही कायदा करू. मात्र अधिकार नसेल तर संसदेत केंद्रसरकारने कायदा करुन ही सगळी निवडणूक पारदर्शक व उघडपणे मतदान पध्दतीने झाली पाहिजे. तशाप्रकारची शिफारस केंद्रसरकारकडे करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Dec 14, 2021 06:54 PM
Breaking | मुंबई-पुण्यात पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार
Nagpur | मध्य प्रदेशात होत नसेल तर महाराष्ट्रात ही निवडणूका होणार नाही – विजय वडेट्टीवार