भविष्यवाणी करा पण 5 वर्ष मविआ सरकार टिकणार - नवाब मलिक

भविष्यवाणी करा पण 5 वर्ष मविआ सरकार टिकणार – नवाब मलिक

| Updated on: Nov 26, 2021 | 5:17 PM

आता नारायण राणे यांनी भविष्यवाणीचं टेंडर घेतलं आहे. काही लोकांकडे 23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावं लागतंय, असा जोरदार टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा केलाय. राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. राणेंच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राणेंवर जोरदार पलटवार केलाय.  सरकार पडेल ही भविष्यवाणी करुन देवेंद्र फडणवीस थकले. त्यानंतर चंद्रकांत पाटीलही बोलायचे. आता नारायण राणे यांनी भविष्यवाणीचं टेंडर घेतलं आहे. काही लोकांकडे 23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावं लागतंय, असा जोरदार टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 26 November 2021
एसटी संपावर कायम राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन करणार, शेखर चन्ने यांची माहिती