‘एकच वादा अजित दादा’, अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, बारामतीत ताफा अडवत काय केली मागणी?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी अजित पवार यांचा ताफा बारामतीमध्ये रोखल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना बारामतीतून तुम्हीच निवडणूक लढवा, अशी विनंती केली तर आजच्या आज उमेदवारी जाहीर करा, यासाठी विनंती देखील केल्याचे पाहायला मिळाले.
बारामतीत अजित पवार यांच्या समर्थकांचा एकच राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या गाडीसह त्यांचा ताफा रोखला आणि एकच वादा अजित दादा अशी घोषणाबाजी केली. अजित दादा तुम्ही आजच्या आज बारामतीचा उमेदवार जाहीर करा, असे म्हणत अजित पवार यांचे समर्थक हट्टाला पेटल्याचे पाहायला मिळाले. बारामतीमधून तुम्हीच लढा. बारामतीमधील आमच्या मनातील उमेदवार तुम्हीच आहात अशा विनवण्या यावेळी समर्थकांनी करत बारामतीच्या रस्त्यातच ठिय्या मांडल्याचे पाहायला मिळाले. केवळ घोषणाबाजीच नाहीतर कार्यकर्त्यांनी अजित पवारांना गाडीबाहेर येण्याची विनंती केली. आजच्या आज बारामतीचा उमेदवार जाहीर करा, अशी मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली. या सगळ्या प्रकारानंतर अजित पवार गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी कार्यकर्तायंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “तुमच्या मनातला उमेदवार मी देईन”, असं आश्वासन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं आणि आक्रमक कार्यकर्ते थोडं शांत झाले.