Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब, तिसऱ्या दिवशी अजितदादा विधिमंडळात प्रकटले? नॉट रिचेबल असण्याचं कारण आलं समोर
दोन दिवसांपासून अनुपस्थित असणारे अजित पवार आज सभागृहात असणार आहे. अजित पवार आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असणाऱ्या अजित पवार यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. दोन दिवसांपासून अनुपस्थित असणारे अजित पवार आज सभागृहात असणार आहे. अजित पवार आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर ‘थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे अजित दादा नागपुरातील बंगल्यावर आराम करत होते.’, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे. तर अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दोन दिवशी सुरू असलेल्या कामकाजात अजित पवार दिसले नाहीत. अशातच छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. छगन भुजबळांचा राग ओढवून घ्यायला नको, म्हणून अजित पवार हे नॉट रिचेबल झालेत, अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र आज अजित पवार सकाळीच विधानभवनात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले इतकंच नाहीतर ते कामकाजातही सहभागी होतील. अजित पवार घशाच्या संसर्गामुळे गेले दोन दिवस हिवाळी अधिवेशनात अनुपस्थित होते. त्यामुळे ते दोन दिवस आराम करत होते. मात्र आता दोन दिवसांनी अजित पवार हे विधिमंडळात दाखल झालेत. त्यापूर्वी त्यांच्या बंगल्यावर भेटण्यासाठी अंसख्य कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली होती. त्यांच्या भेटीगाठी सकाळपासूनच सुरू झाल्याची माहिती मिळतेय.