आधी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं, आता सरकारलाच घेरलं; अजित पवार पुन्हा एसटीच्या ‘त्या’ जाहिरातीवर आले

| Updated on: Mar 03, 2023 | 2:03 PM

VIDEO | रोग हाल्याला आणि इंजेक्शन पखालीला, या ग्रामीण म्हणीचा वापर करत पुन्हा राज्य सरकारवर हल्लाबोल, बघा का भडकले अजित पवार?

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून आजच्या दिवशी देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुगलबंदी सुरू आहे यावेळी राज्यातील विविध प्रश्नांवरून शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून सुरू असल्याचा पाहायला मिळाले. अजित पवार यांनी एसटी वरील जाहिरातबाजीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी सभागृहात त्यांनी खराब अवस्थेतील बसवर सरकारने केलेल्या जाहिरातीचा फोटो दाखवत मुख्यमंत्र्यांना चांगलंच कोंडीत पकडले होते. मात्र अजित पवारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सरकारने थेट संबंधित एसटी आगारातील कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आज अजित पवार सभागृहात पुन्हा एकदा आक्रमक झाले. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी नव्हती तर सरकारने जाहिरातबाजीवरील उधळपट्टी थांबवावी असं आमचं म्हणणं असल्याचं विधिमंडळात अजित पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र सरकारने आपला दोष लपवण्यासाठी भूम आगारातील काही कर्मचाऱ्यांचे निलंबन केलं आणि आणखीन कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितलं जात आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Published on: Mar 03, 2023 02:03 PM
संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यामागे वरुण सरदेसाई यांचा हात?, ‘या’ भाजप नेत्यानं विधानसभेत केला गौप्यस्फोट
पुण्यात निवडणूक संपली तरीही बॅनरवॉर सुरू, ‘हू इज धंगेकर?’ला ‘धीस इज धंगेकर’ने प्रत्युत्तर