कुटुंबियांची साथ नाही? अजितदादांचं विरोधकांना चोख उत्तर; म्हणाले, ‘मेरी माँ मेरे…’

| Updated on: May 07, 2024 | 11:53 AM

सर्व पवार कुटुंब तुमच्या विरोधात आहेत. तुमचं कुटुंब आणि तुमची आईसुद्धा तुमच्यासोबत नाहीत, अशी टीका अजित पवारांवर विरोधकांकडून केली जात होती. त्यावर अजित पवारांनी आपल्या शैलीत विरोधकांना चोख उत्तर दिलंय. 'माझ्या घरात पवार परिवारात माझी आईच सर्वात मोठी आहे. माझी आईच...'

माझ्या घरात पवार परिवारात माझी आईच सर्वात मोठी आहे. माझी आईच माझ्या सोबत असल्यामुळे बाकीचा काय विचार करतात. मेरी माँ मेरे साथ है… असं वक्तव्य करत अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेवर अजित दादांनी आपल्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिलं आहे. सर्व पवार कुटुंब तुमच्या विरोधात आहेत. तुमचं कुटुंब आणि तुमची आईसुद्धा तुमच्यासोबत नाहीत, अशी टीका अजित पवारांवर विरोधकांकडून केली जात होती. त्यावर माध्यमांनी सवाल केला असता अजित पवारांनी चोख उत्तर दिलं. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या संवाद असलेल्या दिवार चित्रपटाचीच आठवण त्यांनी लोकसभेच्या रणधुमाळीत करून दिल्यानं त्यांच्या वक्तव्याची चर्चा होतेय. अजित पवार सर्व कुटुंबासह काटेवाडीत मतदानासाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी सुमित्रा पवार आणि अजित पवार त्यांच्या आईचे हात हातात घेऊन मतदान केंद्रावर आले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Published on: May 07, 2024 11:53 AM
PM Modi Voting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
रत्नागिरी-सिंधुदुर्गात आज मतदान अन् उदय सामंतांचे सख्खे बंधू नॉटरिचेबल; उमेदवारी न दिल्यानं किरण सामंत नाराज?