अजित पवार यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट, सांगितलं भेटीमागचं कारण?

| Updated on: Feb 26, 2023 | 6:11 PM

VIDEO | राज्यपाल रमेश बैस यांच्या सदिच्छा भेटीनंतर काय म्हणाले राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार? बघा व्हिडीओ

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या विधिमंडळ सदस्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने बैस यांचे राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अनिल पाटील, अनिल परब, सुनील प्रभु, विनोद निकोले, कपिल पाटील हे देखील उपस्थित होते. ही भेट झाल्यानंतर अजित पवार म्हणाले, राज्यपाल रमेश बैस यांची चांगली भेट झाली. रायपूर मतदारसंघातून खासदारकीचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलंय, त्यामुळे त्यांना सगळ्याची माहिती आहे आणि ते त्रिपुराचे पहिले राज्यपाल होते. त्यांच्याशी चांगली भेट झाली असून या भेटीदरम्यान रमेश बैस यांचे विचार, दृष्टिकोन सकारात्मक वाटल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Published on: Feb 26, 2023 06:11 PM
‘ठाकरे म्हणजे धनुष्यबाण आणि…’, शिवगर्जना अभिनायनांतर्गत ठाकरे गटाच्या नेत्याची शिंदे गटावर सडकून टीका
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं, निकालाची उत्सुकता; कधी होणार मतमोजणी?