Ajit Pawar : ‘शरद पवारांना मी सोडायला नको होतं…’, बारामतीत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 17, 2024 | 12:43 PM

मी शरद पवारांना सोडलं नाही. दरम्यान, सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते सरकारमध्ये जावू. विरोधी पक्षात असल्यामुळे कामांना स्थगिती आली होती, असं अजित पवारांनी म्हटलंय.

‘मी शरद पवार यांना सोडायला नको होतं असं काहींना वाटतं’, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. तर अजित पवार असंही म्हणाले, मी शरद पवारांना सोडलं नाही. दरम्यान, सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते सरकारमध्ये जावू. विरोधी पक्षात असल्यामुळे कामांना स्थगिती आली होती, असं अजित पवारांनी म्हटलंय. बारामतीतील माळेगावमध्ये बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. हेच वक्तव्य सध्या चर्चेत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित पवार हे आज गावभेट दौऱ्यावर आहेत. बारामतीमधील ढाकाळे याठिकाणी भेट देऊन त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यादरम्यान, अजित पवार हे नागरिकांशी संवाद साधत असून त्यांना मार्गदर्शनासह मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. लोकांना वाटत होतं की मी शरद पवार साहेबांना मी सोडायला नको होतं. परंतु मी साहेबांना सोडलं नाही. सर्व आमदारांच्या सह्या होत्या, असं अजित पवार म्हणाले. तर पवार साहेब निवृत्त झाले तर मग बारामतीकडे कोण लक्ष देऊ शकतो. लोकसभेला साहेबांना साथ दिली. आता मला साथ द्या, असं अजित पवार माळेगाव येथे बोलताना म्हणाले

Published on: Nov 17, 2024 12:43 PM
नवनीत राणांच्या सभेत मोठा राडा; शिवीगाळ, अंगावर खुर्च्या भिरकवल्या अन् अल्लाहच्या घोषणा
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?