बारामती मतदारसंघातून उभंच राहत नाही, असं मी सुरूवातीला म्हणत होतो, असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलंय. पुढे अजित पवार असेही म्हणाले, पुरंदर, शिरूर, हवेली, सिन्नरमधील कार्यकर्ते बोलवत होते. एवढी कामं केलीत की कार्यकर्ते म्हणत होते की तुम्हाला बिनविरोध निवडून आणू…पण म्हणतात ना जिथं पिकतं तिथं विकत नसतं, असं अजित पवारांनी म्हटलंय. बारामतीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे सुरू असताना नागरिकांशी संवाद साधताना अजित पवार यांनी असं वक्तव्य केलंय. ‘माझी प्रशासनावर जी पकड आहे ती इतर कुणाची नाही आणि भावनिक होऊन जर काही करायला गेलात. तर तो तुमचाच अधिकार आहे. मी सुरूवातीला म्हणत होतो बारामतीत उभंच राहत नाही. त्यावेळी मला पुरंदर, शिरूर, हवेली, सिन्नर या भागातील कार्यकर्ते मला बोलवत होते. दादा तुम्ही ऐवढी कामं केली की तुम्हाला मी बिनविरोध निवडून आणतो. पण असं म्हणतात ना जिथं पिकतं तिथं विकत नसतं त्यातला तो प्रकार आहे.’, असं अजित पवार म्हणाले.