‘चुन चुन के मारूंगा, अरे तुझ्या घरचं आहे का?’; अजितदादांचा टोला नेमका कोणाला?
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यात शिंदे गटावर निशाणा साधला, कोणाला अजित पवार यांनी मारला 'चुन चुन के मारूंगा, अरे तुझ्या घरचं आहे का?' असा खोचक टोला.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यात शिंदे गटावर निशाणा साधला. जे काही आहे ते सगळं आपलंच आहे, असे शिंदे गटातील ४० आमदारांना वाटते. त्यामुळे ते वाटेल ते बोलत असतात. ‘चुन चुन के मारूंगा, अरे तुझ्या घरचं आहे का?’, असा सवालही यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, चार ते पाच लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणारे तुम्ही आमदार आहात, कसं वागलं-बोललं पाहिजे. शिंदे गाटातील एका आमदाराने बोलताना असे म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा केला, तशा प्रकारचाच गनिमी कावा हा एकनाथ शिंदे यांनी केला, यावर बोलतानाही अजित पवारांनी मिश्कील भाष्य केले. जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा कळेल काय असतो गमिनी कावा, असे म्हणत खोचक टोलाही लगावला.
Published on: Jan 16, 2023 08:12 AM