संदीपान भुमरेंनी काय दिलं, हे दारू…; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेत्यांचा नेम
चंद्रपूरनंतर आता संभाजीनगरात दारूचा मुद्दा गाजतोय. महाविकासआघाडीमध्ये असताना अजित पवार यांनी दारूच्या दुकानावरून संदीपान भुमरेंवर जे आरोप केले होते. त्याच मुद्द्यावरून विरोधक संदीपान भुमरे यांना घेरताना दिसताय. नेमंक काय म्हणाले होते अजित पवार आणि त्यावेळी भुमरे यांनी काय केला होता पलटवार? बघा स्पेशल रिपोर्ट
महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवार यांनी संदीपान भुमरे यांच्यावर केलेली टीका आता संभाजीनगरात चर्चेत आली आहे. त्याच टीकेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधलाय. चंद्रपूरनंतर आता संभाजीनगरात दारूचा मुद्दा गाजतोय. महाविकासआघाडीमध्ये असताना अजित पवार यांनी दारूच्या दुकानावरून संदीपान भुमरेंवर जे आरोप केले होते. त्याच मुद्द्यावरून विरोधक संदीपान भुमरे यांना घेरताना दिसताय. अद्याप या सर्व टीकेनंतर संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया काही समोर आली नाही. मात्र अजित पवार मविआमध्ये असताना हा मुद्दा गाजला होता. ज्या रस्त्याला लागून भुमरे यांचं दारूचं दुकान आहे. मुद्दाम तेथेच स्पीडब्रेकर लावण्यात आल्याच पवार यांनी म्हटलं होतं. नंतर ते स्पीडब्रेकर हटवण्यात आले. नेमंक काय म्हणाले होते अजित पवार आणि त्यावेळी भुमरे यांनी काय केला होता पलटवार? बघा स्पेशल रिपोर्ट