अजित पवारांची विशेष रणनिती, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं ‘गुलाबी कॅम्पेन’? विरोधकांची हल्लाबोल

| Updated on: Jul 20, 2024 | 11:00 AM

अजित पवार यांनी आपल्या दैनंदिन जीवनात गुलाबी रंगाचा वापर वाढवल्याचे पाहायला मिळत आहे. यावरूनच विरोधकांकडून अजित पवारांकडून गुलाबी कॅम्पेन चालवलं जातंय का? असा सवाल केला जात आहे. इतकंच नाहीतर अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटवरूनही सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून एक विशेष रणनिती आखण्यात आली आहे. पक्षाला नवा रंग, रूप देण्याची तयारी अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. यासाठी पक्षाचे कार्यक्रम आणि सभांमध्ये गुलाबी रंगाचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तर अजित पवार यांनी आपल्या दैनंदिन जीवनात गुलाबी रंगाचा वापर वाढवल्याचे पाहायला मिळत आहे. यावरूनच विरोधकांकडून अजित पवारांकडून गुलाबी कॅम्पेन चालवलं जातंय का? असा सवाल केला जात आहे. इतकंच नाहीतर अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटवरूनही सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील सर्वच कार्यक्रमात गुलाबी रंगाची थीम पाहायला मिळतेय. सर्वात पहिल्यांदा राज्याचं बजेट सादर केलं तेव्हा, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं तेव्हा अजित पवार गटाच्या आमदारांच्या खांद्यावर गुलाबी उपरणं, विधानसभांच्या पायऱ्यांवर, विधानपरिषदेच्या निकालादिवशी अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं. त्यावरून विरोधकांनी एकच हल्लाबोल केलाय.