Ajit Pawar : सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजितदादांची मोठ्या पदावर वर्णी, सर्व आमदारांचा एकत्रित निर्णय
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार यांची एका मोठ्या पदावर वर्णी लागल्याची मोठी माहिती समोर आली आहे. नुकतेच अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानतंर आता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार यांची एका मोठ्या पदावर वर्णी लागल्याची मोठी माहिती समोर आली आहे. नुकतेच अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांची सर्व आमदारांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या विधिमंडळाच्या गटनेत्याची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदार उपस्थितीत होते. झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी एकमताने अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड केली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर महाविकासआघाडीचा दारुण पराभव झालाय. यामध्ये भाजप १३२ जागा, शिवसेना शिंदे गट ५७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ४१ जागांवर आघाडीवर आहेत. अजित पवार गटाने या निवडणुकीत केवळ ५३ ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यापैकी तब्बल ४१ जागांवर अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.