भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ला दादांचा विरोध अन् नाऱ्यामुळे महायुतीत अजित पवारांची कोंडी

| Updated on: Nov 17, 2024 | 11:33 AM

अजित पवार गटाची भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे सध्या दोन्ही बाजूने कोंडी झालीये. एका बाजूला शरद पवारांच्या मुख्य निशाण्यावर अजित पवार गटाचे प्रमुख नेते आहेत. तर दुसरीकडे भाजपचा नारा चुकीचा ठरवत आम्ही विचारधारा सोडली नसल्याचे अजित पवार गटाचे प्रमुख नेत्यांना वारंवार सांगावं लागतंय.

भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे महायुतीत सध्या अजित पवारांची कोंडी होऊ लागली आहे. दररोजच्या भाषणामध्ये अजित पवारांना त्याबाबत स्पष्टीकरण देत विरोध करावा लागतोय. त्यावरून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना एक आव्हान दिलंय. एकाबाजूने भाजप नेते बटेंगे तो कटेंगेचं रोज जाहीरपणे समर्थन करताय. त्यावर रोज रोज स्पष्टीकरण देत अजित पवार गटाला विरोध करावा लागतोय. यावर खरोखरच अजित पवारांनी आपली विचारधारा सोडलेली नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं, असं आव्हान काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी दिलं आहे. अजित पवार गटाची भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे सध्या दोन्ही बाजूने कोंडी झालीये. एका बाजूला शरद पवारांच्या मुख्य निशाण्यावर अजित पवार गटाचे प्रमुख नेते आहेत. तर दुसरीकडे भाजपचा नारा चुकीचा ठरवत आम्ही विचारधारा सोडली नसल्याचे अजित पवार गटाचे प्रमुख नेत्यांना वारंवार सांगावं लागतंय. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतीही विचारधारा नसल्याचे छगन भुजबळ आणि अजित पवार म्हणाले होते. मात्र बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर आम्ही विचारधारा सोडली नसल्याचे अजित पवार म्हणताय.

Published on: Nov 17, 2024 11:33 AM