अजित पवार बोकांडी बसलेत, त्यांना महायुतीतून काढून टाका, दादांवर कोण भडकलं?
अजित पवार बोकांडी बसले असल्याची टीका सुदर्शन चौधरी यांनी केली आहे. अजित पवार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. विधानसभेची सत्ता नकोय, पण अजित दादांना महायुतीतून काढा, अशी थेट मागणीच सुदर्शन चौधरींंनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी संघ आणि भाजपच्या बैठकीत अजित पवार यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र आता पुणे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अजित पवार यांना महायुतीतून काढा, अशी मागणी केली आहे. अजित पवार बोकांडी बसले असल्याची टीका सुदर्शन चौधरी यांनी केली आहे. अजित पवार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. विधानसभेची सत्ता नकोय, पण अजित दादांना महायुतीतून काढा, अशी थेट मागणीच सुदर्शन चौधरींकडून करण्यात आली आहे. शिरूर लोकसभेची आढावा बैठक पुण्यात पार पडली. त्या बैठकीत राहुल कुलही होते. त्यांच्या समोरच सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, अशी मागणी केली. यानंतर आता पुण्याच्या अजित पवार यांच्या गटाच्या रूपाली ठोंबरे पाटील चांगल्याच भडकल्याचे पाहायला मिळाले. बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Jun 28, 2024 10:34 AM