अजितदादांनी मनसोक्त मारला दही धपाट्यांवर ताव, बीडमधील जनसन्मान यात्रेतील बघा दृश्य

| Updated on: Aug 29, 2024 | 2:01 PM

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ८ ऑगस्टपासून राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे अध्यक्ष अजित पवार स्वतः राज्यभरात दौऱे करून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे. अजित पवार यांच्यासोबत बीडमधील जनसन्मान यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर हे देखील उपस्थित आहे. बीड शहर जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने गुलाबीमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड शहरातून ही यात्रा निघाली. यावेळी चौकाचौकात क्रेन लावून त्याच्या सहाय्याने पुष्पवृष्टी आणि हार घालून अजित पवार यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला बाईकस्वार असल्याचे पाहायला मिळाले तर त्यांच्या हातामध्ये गुलाबी रंगाचे झेंडे देखील होते. दरम्यान, बीडमध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी दही धपाट्यांवर ताव मारल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ…

Published on: Aug 29, 2024 02:01 PM
कल्याण पश्चिमेत पुन्हा शिवसेना vs भाजप? विधानसभेची जागा कोणाकडे जाणार? महायुतीत रस्सीखेच?
‘मी जरी विरोधी पक्षात असते तरी…’, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?