अजित पवार यांचा शंभुराज देसाई यांना बुक्का अन् दोघेही मिश्किल हसले, काय घडलं?
VIDEO | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शंभुराज देसाई यांना का मारला बुक्का, काय घडला त्यांच्यात किस्सा?
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई, धुळ्याचे एमआयएमचे आमदार फारूख शेख यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यासाठी गेले. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी फोटो काढण्यासाठी अजितदादा पवार यांना हाक मारली. दरम्यान, अजित पवार यांनी शंभुराज देसाई यांच्यासोबत केलेल्या मस्करीचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. शंभुराज देसाई यांनी आपला हात अजित पवार यांच्या लगेच नेला आणि लगेचच अजित पवार यांनी शंभुराज देसाई यांच्या मांडीवर बुक्का लगावल्याचे पाहायला मिळाले. यानंतर दोघेही मिश्किलपणे हसू लागले. मात्र यावेळी नेमकं दोघांमध्ये काय घडलं असेल? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.