चंद्रशेखर बानवकुळे यांच्या ४४० चा करंटच्या आरोपांवर अजित पवार यांचं प्रत्युत्तर, बघा आता काय म्हणाले?

| Updated on: Feb 21, 2023 | 10:14 PM

VIDEO | पुन्हा सुरू झालं करंट वॉर, चंद्रशेखर बानवकुळे यांच्या आरोपांवर काय म्हणाले अजित पवार? बघा व्हिडीओ

पुणे : विरोधी पक्ष नेते अजित पवार अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तारतम्य बाळगून बोलण्याचा सल्ला दिला होता. यानंतर पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्याचे दौरे सुरू आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४४० करंटचा उल्लेख केला. याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. आता जनताच ठरवेल कोणाला ४४० चा करंट द्यायचा, मला अशा प्रश्नांना उत्तर देऊन वेळ घालवायचा नाही, असे म्हणत अजित पवार यांनी विषय टाळल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार यांना पहाटेच्या शपथ विधी बाबत देखील माध्यमांनी प्रश्न विचारला असता. अजित पवार यांनी नाव न घेता भाजप नेते रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे. आठ वाजता तुम्ही पहाट म्हणायला लागलात तर दुर्दैवं आहे. जे तीन वर्षांपूर्वी झालं तेच पुन्हा पुन्हा उगळण्यात काय अर्थ आहे, असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published on: Feb 21, 2023 10:11 PM
एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक, ‘या’ तारखेपासून आझाद मैदानावर करणार आंदोलन?
शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, पहिल्याच बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे ठराव