अजित पवार यांनी मनसेची उडवली खिल्ली! म्हणाले, एवढ्या मोठ्या पक्षाचा पाठिंबा म्हणजे…

| Updated on: Feb 17, 2023 | 8:18 AM

VIDEO | मनसेने भाजपला दिलेल्या पाठिंब्याची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उडवली खिल्ली, बघा व्हिडीओ

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, मनसेने भाजपला दिलेल्या पाठिंब्याची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खिल्ली उडवली आहे. मनसे सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला म्हणजे आमचे धाबे दणाणले आहेत, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला आहे. मीडियाशी संवाद साधताना अजितदादांनी ही टोलेबाजी केली. अजित पवार यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड प्रकरणावरून राज्य सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे आधीच दाखल झाले होते. तेव्हा मी त्यांना भेटलो होतो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. नवीन पायंडे कोणी पाडू नये. महाराष्ट्राला आपण सुसंस्कृत मानतो, असेही ते अजित पवार म्हणाले.

Published on: Feb 17, 2023 08:18 AM
बोक्याहो आम्ही पक्के खोकेवाले… भर सभेत गुलाबराव पाटील यांची तुफान फटकेबाजी
भाजप नेत्याचा आदेश, म्हणाला अजित पवार यांना द्या ४४० चा करंट, पुन्हा नाव…