पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, अजित दादांच्या कबुलीवर समर्थकाचं पत्र व्हायरल

| Updated on: Sep 12, 2024 | 11:13 AM

बारामतीमध्ये कथितपणे एका अजित पवार समर्थकाचं पत्र सध्या व्हायरल झालं आहे. बारमतीमधील लढतीबद्दल अजित पवार यांनी माफी मागितली. मात्र आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचं? असा सवाल या पत्राद्वारे करण्यात आला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Follow us on

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधासभा निवडणुकीच्या तोंडावर आता बारामतीत अजित पवार समर्थकाचं एक पत्र सध्या व्हायरल झालं आहे. भावनिक राजकारणाचा सल्ला देणारे अजित पवारच भावनिक कार्ड का खेळताय? असा सवाल या पत्राद्वारे करण्यात आला आहे. या पत्रातून असे म्हटलंय की, दादा बरे आहात का…हल्ली तुमची काळजी वाटते. दुर्दैव आहे की हे पत्र नाव न लिहिता लिहावं लागतंय. कारण नाव कळालं तर पुढे राजकारणात भविष्य राहिल की नाही हा प्रश्न आहे. आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणंही बददलंय. जाहीर सभेत चूक झाली म्हणून कबुली देताय, कधी खदखद व्यक्त करताय. कधी भावनिक होताय, की सहानुभूतीचं कार्ड खेळताय? तुम्ही माफी मागून मोकळे झालात, पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो. आता आम्ही कुणाची माफी मागायची हे सुद्धा सांगा… असं या पत्रातून समर्थकानं म्हटलंय.