MSRTC Strike : ‘डंके की चोट पे’ वाला कुठं गेला? अजितदादांचा टोला, सदावर्तेंकडून प्रत्युत्तर
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढा देणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंनी जल्लोष केला आणि त्यावेळी अजित पवार यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर, म्हणाले...
अजित पवार यांनी पहिल्यांदा वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटी विलनीकरणाची मागणी करणारे आता कुठे आहेत?, असा सवालच त्यांनी उपस्थितीत केला आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्याचा पगार जो थकीत होता तो नुकताच कर्मचाऱ्यांना वितरीत करण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढा देणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंनी जल्लोष केला आणि त्यावेळी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देखील दिल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना सदावर्ते म्हणाले, ‘दम असेल तर पुण्यात या आणि समोरा-समोर येऊन बोला. माझ्या नादी लागायचे नाही. मी वैचारिकदृष्ट्या सुदृढ आहे.’, असे खुले आव्हानच त्यांनी अजित पवार यांना दिले.