Ajit Pawar : ‘बच गया… दर्शन घे काकांचं..’, अचानक समोर येताच अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला खोचक टोला

| Updated on: Nov 25, 2024 | 11:33 AM

कराडच्या प्रीतीसंगमावर एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार, रोहित पवार आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी रोहित पवार यांना मिश्किल टोलाही लगावला.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज 40 स्मृतिदिन आहे. कराडच्या प्रीतीसंगमावर एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार, रोहित पवार आणि अजित पवार उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेते मंडळी प्रीतीसंगमावर गेले होते. मात्र तेथून परतत असताना रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, एकमेकांवर टीका करणाऱ्या काका-पुतण्यामध्ये यावेळी मिश्किल संवाद झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी हक्काने सांगितल्यानंतर रोहित पवार यांनी अजित दादांचा पाय पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. इतकंच नाहीतर यावेळी अजित पवार यांनी ‘बच गया… दर्शन घे काकांचं..’ असं म्हणत रोहित पवार यांना मिश्किल टोलाही लगावला. तर शहाण्या थोडक्यात वाचलास…माझी सभा झाली असती तर काय झालं असतं? असा खोचक सवालही यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांना केला.

Published on: Nov 25, 2024 11:33 AM
CM Formula : मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत ‘हे’ दोन फॉर्म्युला निश्चित अन्…
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत फडणवीसांना वाढता पाठिंबा, ‘या’ नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांचीही पसंती