Chhagan Bhujbal : ‘हा मैं नाराज हूँ, वहाँ नही रहेना…’, मंत्रिपदावरून डावलल्यानंतर छगन भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?

| Updated on: Dec 17, 2024 | 10:21 AM

अजित पवारांनी मंत्रिपद न दिल्याने छगन भुजबळांनी ऑन कॅमेरा आपली नाराजी व्यक्त केली आणि बंडाचे संकेत दिलेत. जहाँ नही चैना.. असं म्हणत छगन भुजबळांनी एकप्रकारे बंडाचा सूचक इशारच दिला आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्यानंतर छगन भुजबळ यांचा भडका उडाला आहे. जे नेते जुने झालेत त्यांना फेकून देणार का? असा सवाल करत बंडाचा झेंडा हाती घेतल्याचे दिसतंय. बुधवारी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. ‘हा मैं नाराज हूँ, जहाँ नही चैना, वहाँ नही रेहेना…’, असं म्हणत छगन भुजबळांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. अजित पवारांनी मंत्रिपद न दिल्याने छगन भुजबळांनी ऑन कॅमेरा आपली नाराजी व्यक्त केली आणि बंडाचे संकेत दिलेत. जहाँ नही चैना.. असं म्हणत छगन भुजबळांनी एकप्रकारे बंडाचा सूचक इशारच दिला आहे. यावेळी छगन भुजबळांना पत्रकारांनी पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का असा सवाल केला असता, त्यावर त्यांनी खुबीने उत्तर दिलं. समता पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी बैठक घेऊन पुढे काय करायचं ते ठरवू, असं भुजबळ म्हणाले. यानंतर छनग भुजबळ आणि अजित पवारांमध्ये संवाद राहिला की नाही? हा ही सवाल उपस्थित होत आहे. कारण मंत्रिपदावरून डावलल्यानंतर आपल्याला अजित पवार यांच्याशी बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.

Published on: Dec 17, 2024 10:21 AM