Ajit Pawar : अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामतीच्या काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यात लढत आहे. अशातच उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनी भल्या सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे
महाराष्ट्रात 288 जागांसाठी आज मतदान होत आहे. अशातच बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यात लढत आहे. अशातच उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनी भल्या सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना निर्णय घ्यायचा की पुढच्या पाच वर्षांसाठी महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा आहे. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघात विधानसभेची निवडणूक आज होतेय. योग्य उमेदवारा मतं देऊन सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावावा, असे म्हणत अजित पवार यांनी मतदानाला जाताना प्रतिक्रिया दिली. तर महाराष्ट्राची घोडदौड कायम राहिल अशा पद्धतीने मतदान करा, असं म्हणत अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला योग्य मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील चित्र यंदा सकारात्मक असेल. बारामती ठरवतील की आता किती लीड द्यायचंय, असे म्हणत अजित पवारांनी विश्वास व्यक्त केला.