‘तुमको क्या पता मेरे दिल मे क्या दुख…’, छगन भुजबळांच्या मनात कसली खंत? नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jun 14, 2024 | 11:49 AM

खासदारकीसाठी इच्छुक असलेल्या छगन भुजबळांकडूनच राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हजर होत. मात्र भाजप किंवा शिंदे गटाकडून एकही नेता यावेळी हजर नव्हता

Follow us on

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना पसंती दिली आहे. इतकंच नाहीतर त्यांनी अर्जही दाखल केला. मात्र राज्यसभेसाठी इच्छुक असलेले मंत्री छगन भुजबळ नाराज आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. खासदारकीसाठी इच्छुक असलेल्या छगन भुजबळांकडूनच राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हजर होत. मात्र भाजप किंवा शिंदे गटाकडून एकही नेता यावेळी हजर नव्हता. तर सुनेत्रा पवार हे राज्यसभेचा अर्ज भरणार हे माहित नव्हतं, असं भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी सांगितले. खरंतर एकदिवस आधीच सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा सुनील तटकरे पत्रकार परिषदेत करणार होते. पण भुजबळांनी आपणही आग्रह असल्याचं सांगितलं आणि त्यांच्या नावाची घोषणा लांबली. मात्र अंतिम शिक्कामोर्तब सुनेत्रा पवारांच्या नावावरच झालं.