Special Report | राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार? शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फुटणार?

| Updated on: Apr 17, 2023 | 6:55 AM

VIDEO | शिंदे यांचं सरकार जाऊन अजित पवार होणार नवे मुख्यमंत्री? दिल्लीत अमित शाह यांची अजितदादांनी घेतली भेट? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी आपली स्वतःची शिवसेना तयार केली. यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर आता राष्ट्रवादी फुटण्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले होते. यादरम्यान, अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यी भेट घेतल्याचेही म्हटले गेले. ज्यावेळी अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाले त्यावेळी त्यांनी पित्ताचं कारण देत अमित शाह यांची भेट घेतली अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली यानंतर कोणीही आलं तर त्यांच्या भाजपमध्ये स्वागतच असेल असं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलंय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 17, 2023 06:49 AM
महाविकास आघाडीत फूट पाडायचा प्रयत्न चाललाय, पण…; पृथ्वीराज चव्हाण विरोधकांवर बरसले
अजित पवार भाजपसोबत आले तर…, शिंदे यांच्या शिवसेनेचं काय होणार? बघा स्पेशल रिपोर्ट