‘आता फक्त काचा फुटल्यात थोबाड फुटायला…’, अमोल मिटकरी अन् मनसेच्या भांडणात राणेंची उडी
मिटकरी आणि मनसे नेत्यांच्या वादात आता भाजपच्या निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. मात्र पदाधिकाऱ्यांच्या या शाब्दिक वादाची धग महायुतीतील खटके उडण्याच्या दिशेने तर जात नाही ना? अशीही शंका वर्तविली जात आहे. या सगळ्यामध्ये वादाला कारण ठरणारं विधान केलं राज ठाकरे यांनी त्यावरून जहाल प्रत्युत्तर दिलं राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी...
राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आणि मनसे नेत्यांच्या वादात आता भाजपच्या निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. मात्र पदाधिकाऱ्यांच्या या शाब्दिक वादाची धग महायुतीतील खटके उडण्याच्या दिशेने तर जात नाही ना? अशीही शंका वर्तविली जात आहे. या सगळ्यामध्ये वादाला कारण ठरणारं विधान केलं राज ठाकरे यांनी त्यावरून जहाल प्रत्युत्तर दिलं राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी… त्याविरोधात चेंबूरच्या मनसे पदाधिकाऱ्यांने अकोल्यात जाऊन तोडफोड करण्याची चेतावणी दिली. यावेळी हल्ला करताना हजर असलेल्या एका तरूणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मिटकरी आणि मनसे यांच्यातील वाद अजित पवार आणि राज ठाकरेंवर आक्रमक टीकेपर्यंत गेला. त्यातच निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. गेले दोन दिवस अमोल मिटकरी मनसेला उत्तर देताय. मात्र मुकाबला तोडीस तोड होत असल्याने निलेश राणेंना धावून जाण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे.